भारतीय मजदूर संघ कामगारांसाठी, कामगारांनी, राष्ट्रीय, औद्योगिक व कामगार हितासाठी
भारतीय मजदूर संघ म्हणजे कामगारांनी कामगारांच्या करिता कामगारांद्वारे चालणारे संघटन राष्ट्हित,उद्योग हित, व कामगार हित हेच धोरण घेवून संपुर्ण देश भर कार्यरत आहे.
व्यक्ती पेक्षा संघटना महत्वपूर्ण,
शोषित पिडीत वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगारांच्या सुख सुविधांचा करिता सतत कार्यरत समर्थ स्वायत्ता स्वावलंबी केंद्रीय समाज संघटन सरकारवर अंकुश ठेवणारे, परंतु राजकारणापासून अलिप्त गैर राजनीतिक संघटन भारतीय मातीतले विचार संस्कार परंपरा सन्मान ज्ञानाच्या आधारावर श्रमिकांचा विकास उत्कर्ष प्रगती करणारे संघटन
भारतीय मजदूर संघाचा वेगळेपणा :
झेंडा भगवा - भगवा झेंडा त्या तपस्या बलिदानाचे प्रतीक भारतीय श्रेष्ठत्व परंपरा सांगणारा भगवा ध्वज कामगार क्षेत्रात फडकतो आहे.
चक्र - चक्र हे औद्योगिकरणाचे प्रतीक आहे.
गव्हाच्या ओंब्या शेती व समृद्धीचे प्रतीक आहे.
मूठ ही संघटन शक्तीचे प्रतीक आहे.
अंगठ्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांमध्ये जास्त प्रगती करतो
विश्वकर्मा जयंती प्राचीन काळापासून कारागीर विश्वकर्माचे वैशिष्ट्य समजून आद्य कामगार विश्वकर्मा यांना दैवत मानून अनेक जिल्हा मध्ये, औद्योगिक वसाहतीमध्ये जमशेदपूर या ठिकाणी विश्वकर्मा जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतात. म्हणून विश्वकर्मा जयंतीला 17 सप्टेंबर भारतीय मजदूर संघाने राष्ट्रीय श्रमिक दिन म्हणून स्वीकारले आहे.
भारतीय मजदूर संघाची घोषणा भारत माता की जय यामुळे कामगारांमध्ये राष्ट्रप्रेम जागे होते, देश के हित मे करेंगे काम का लेंगे पुरा दाम । गुणवत्ता पूर्ण उत्पादनामुळे देशाचे नाव , गौरवा बरोबर आर्थिक लाभ मिळाला पाहिजे अशी घोषणा आहे.
भारतीय मजदूर संघ देश हित उद्योग हित व कामगार हित या त्रिसूत्री वर काम करतो आहे.
सर्व हित एकमेकांवर अवलंबून आहे. यामुळेच भारतीय मजदूर संघ देश पातळीवर एक वेगळे संघटन म्हणून देशात एक नंबर वर आहे त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय मजदूर संघाचे सहभाग नोंदवावा व सदस्य व्हावे ही नम्र विनंती!
Data safety
Safety starts with understanding how developers
collect and share your data. Data privacy and security practices may vary based
on your use, region, and age. The developer provided this information and may
update it over time.